जळगाव तालुक्यातून विविध घटनेत अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले

0

 

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क 

 

तालुक्यातील विविध घटनेत दोन गावांमधून दोन १७ वर्षांच्या मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची फिर्याद मुलींच्या पालकांनी एमआयडीसी तसेच तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावातील एका १७ वर्षीय मुलगीला ८ रोजी मध्य रात्री २ वाजेच्या सुमारास गच्चीवर झोपलेली असताना पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यावरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक अनिस शेख करीत आहे. तसेच दुसऱ्या घटनेत तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातून १६ वर्षे ८ महिन्याच्या मुलीला अज्ञात इसमाने ८ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या भावाने तालुका पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उप निरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.