ज्येष्ठ पत्रकार अनिल केऱ्हाळे यांचे निधन

0

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क

टिव्ही नाईन वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी अनिल दत्तात्रय केऱ्हाळे (वय ५२) यांचे मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास मुंबईत निधन झाले. अतिशय दुर्धर अशा व्याधीतून ते बरे झाले होते. तथापि, काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांच्यांवर मुंबईतील ओपोलो रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरु होते. . त्यांचे पार्थिव संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जळगावात दाखल होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तीन बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे.

वृत्तवाहिनींमधील जिल्ह्यातील आघाडीचे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. अनिल केर्‍हाळे यांच्या अकाली मृत्यूमुळे पत्रकारितेसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनिल केऱ्हाळे यांनी महाविद्यालयात असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरु केले. परिषदेच्या अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे त्यांनी काम पाहिले. गेल्या १५ वर्षांपासून ते पत्रकारितेत कार्यरत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.