Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»धक्कादायक.. भगर खाल्याने 500 च्यावर नागरिकांना विषबाधा
    आरोग्य

    धक्कादायक.. भगर खाल्याने 500 च्यावर नागरिकांना विषबाधा

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 28, 2022Updated:September 28, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    सध्या नवरात्रोत्सव सूर असून अनेक जण उपवास करतात. या उपवासासाठी खरेदी केलेल्या भगर व भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  मराठवाड्यातील 500 पेक्षा अधिक नागरिकांना विषबाधा झाली असल्याची गंभीर बाब  समोर आली असून सर्वाधिक संख्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आहे.

    आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यात 118 जणांना विषबाधा झाली असून जालना, बीड जिल्ह्यात देखील अनेकांना भगरीतून विषबाधा झाली आहे.

    सुरवातीला औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथील 13 नागरिकांना विषबाधा झाली होती. त्यानंतर त्याच गावात आणखी 12 जणांना विषबाधा झाली. वैजापूर तालुक्यातील 118 जणांना विषबाधा झाली आहे. तर कन्नड तालुक्यातील 12 जणांना विषबाधा झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालय फुल्ल झाली आहे. विशेष म्हणजे वरील आकडेवारी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची असून, खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या सुद्धा अधिक आहे. त्यामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

    अशी घ्या काळजी 

    – नागरिकांनी कोणत्याही घाऊक-किरकोळ व्यापाऱ्यांकडून, आठवडी बाजारातून, फेरी वाल्याकडुन सुटी भगर अथवा त्याचे पिठ घेऊन सेवन करू नये.

    – नागरिकांनी कुठल्याही धार्मीक समारंभात किंवा घरगुती कार्यक्रमात प्रसाद म्हणुन किंवा उपवासाचा पदार्थ म्हणुन भगर वापरु नये किंवा सेवन करू नये.

    – भगर सेवन केल्यामुळे कोणाला विषबाधा झाल्यास किंवा प्रकृती अस्वस्थ झाल्यास कोणतेही गावठी उपचार करु नये रुग्णांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे.

    – भगर विक्रीचा किरकोळ अथवा घाऊक व्यापारी निर्दशनास आल्यास त्याची माहिती अन्न निरीक्षक यांना तात्काळ दयावी, स्वतः कायदा हातात घेवुन कुठलीही कृती करु नये.

    – किराणा दुकानातून खरेदी करत असलेल्या पाकिटावर FSSI चा परवाना क्रमांक आहे का हे तपासावे.

    – खादय वस्तु खरेदी करत असतांना संबंधित पाकीटाचे सील तपासुन पहावे, तसेच खादय पदार्थाच्या पाकीटावरील उत्पादन दिनांक व वापराची मुदत संपण्याची दिनांक तपासून पाहावे.

     

    #navratri Aurangabad BHAGAR Food Poisoning poisoning
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    प्रसिद्ध हॉटेलचे किचन तपासले, थेट मेलेले उंदीर आढळले

    July 20, 2026

    प्रसिद्ध गायक कुमार सानूच्या मुलाला कोरोना

    July 13, 2026

    बालरंगभूमी परिषद व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी

    July 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif