लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेऊन अत्याचार ;गर्भपात करून दिला लग्नास नकार

0

फैजपूर ;-एका २६ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मुंबई ,जळगाव आदी ठिकाणी लॉजवर नेऊन अत्याचार करून गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करून लागास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने आरोपीविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहितीत अशी कि , पीडिता हि फैजपूर परिसरात राहात असून आरोपी सर्फराज सईद खान वय २४ याने गेल्या सहा महिन्यापासून फिर्यादीच्या राहत्या घरी,मुंब्रा येथील लॉजवर आणि जळगावच्या रेल्वे स्टेशनजवळील लॉजवर नेऊन वेळोवेळी अत्याचार केला . अत्याचारातून पीडिता गर्भवती झाल्याने तिला गर्भ पाडण्यास भाग पाडून तिला लग्नास नकार दिल्याने पीडित तरुणीने फैजपूर पोलिसांत धाव घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.