नेमकं महाविद्यालय कशासाठी? दहशद माजविण्यासाठी कि शिक्षणासाठी

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाविद्यालय हे सरस्वतीच स्वरूप म्हणून आपण सर्वच पाहत असतो. पण हेच महाविद्यालय आता बंडखोरांमुळे बदनाम होतांना दिसत आहे. महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात कि कोयता घेऊन आपली दहशत माजविण्यासाठी? हाच प्रश्न मुळात आता पडला आहे. शेतीच अवजार म्हणून वापरलं जाणारा कोयता आता आपली दहशद माजविण्यासाठी वापरला जात आहे. कधी गाड्यांची तोडफोड करण्यासाठी, तर कधी दोन गटातील भांडणासाठी, तर कधी एकतर्फी प्रेमासाठी, पुण्यातील सदाशिव पेठेतली घटना ताजी असतांनाच आता एका तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता काढला. पोलिसांनी याप्रकारची दाखल घेत, घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला अटक केली आहे. अशा घटनांना आळा बसावा यासाठी आरोपीची कॉलेजमध्येच धिंड काढली आहे.

काय आहे प्रकरण
कुणाल कानगुडे (वय १९ वर्ष) असे तरुणांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कुणालचे आबासाहेब गरवारे महाविद्यालयात डॅनी नावाच्या तरुणाशी काही वाद झाले होते. त्यानंतर कॉलेजमध्ये आपली दहशद राहावी तसेच काही भांडणाच्या कारणामुळे त्याने थेट कॉलेजमधेच कोयता काढून दहशद माजवली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घातस्थळी धाव घेत कॉलेजमधील सीसीटीव्ही तपासून त्या तरुणाला अटक करत डेक्कन परिसरातून आरोपीची धिंड काढली.

Leave A Reply

Your email address will not be published.