जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शिवसेने प्रमाणे राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्यात मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा एक गट सामील झाला. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली. मात्र मंत्र्यंनी शपथ घेतली आणि मंत्री मंडळाचा विस्तार झाला. मात्र खाते वाटप झालेले नाही. अजित दादांना अर्थ खात दिले जाईल हे निश्चित नाही तो एक अंदाज आहे. मात्र गेल्यावेळी अजित दादांकडे अर्थ खात असल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या तक्रारी होत्या ते अस्वस्थ होते. त्यामुळे पुन्हा अजित दादांना तेच खात दिल जात असेल तर त्यामुळेच शिवसेना शिंदे गटाचे आमदारांमध्ये नाराजीचा सूर दिसत असून भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला धोका राहील अशी शक्यता राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे नेते आ. खडसे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील खातेवाटपावर सूचक वक्तव्ये केली. ते म्हणाले की, शिवसेना शिंदे गटाचे बरेच आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. अनेक आमदार सांगत आहेत की मी मंत्री होणार आहे मी पालकमंत्री होणार आहे. काहीजण म्हणत आहेत मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता माझा शपथविधी ठरलेला आहे. प्रत्येकाला मंत्रीपद हवे आहे, प्रत्येक जण मंत्री मंडळात जाण्यात इच्छुक आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवरून मंत्रिमंडळ विस्ताराने खाते वाटप नंतर नाराजी ही उफाळून येणार असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या ही आमदारांमध्ये नाराजी आहे मात्र ते त्यांच्यातील नाराजी बाहेर बोलत नाही. भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपमधील अनेक आमदार माझ्याशी बोलताना नाराजी व्यक्त करतात.राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या निर्णया विरोधात ते नाखुश असल्याचे सांगतात असे त्यांनी सांगितले. भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही. मात्र सध्या राज्यात जो घाणेरडा प्रकार सुरू आहे, तो यापूर्वी महाराष्ट्राने कधी पाहिलेला नाही. पक्ष फोडणे हेच प्रथम कर्तव्य देवेंद्र फडणवीस यांचे दिसत असल्याचा टोलाही आ. खडसेंनी लगावला. भविष्यात एकनाथ शिंदे हे अपात्र झाल्यास त्यांच्या जागी अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नाही असेही त्यांनी सांगितले.