रोटरी क्लब जळगावतर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

रोटरी क्लब जळगावतर्फे सोमवार दि.१०/०७/२०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता डॉ.हेमंत बाविस्कर यांचे नेत्रायु हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या, यावेळी रो. पीडिजी मोहन पालेशा व क्लबचे मानद सचिव ॲड.हेमंत भंगाळे उपस्थित होते.

दरम्यान रोटरी क्लब जळगावच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम वर्षभर राबविणार असल्याची माहिती अध्यक्ष मनोज जोशी व मेडिकल कमिटी चेअरमन पी.पी डॉ.तुषार फिरके यांनी दिली. ३ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमासाठी डॉ. जयंत जहागीरदार त्यासोबत त्यांचा स्टाफ, डॉ. हेमंत बाविस्कर, वैशाली बाविस्कर व त्यांचा स्टाफ, तसेच सदस्य योगेश गांधी, राघवेंद्र काबरा, राजेश वेद, संदीप शर्मा, अमोल पाटील, किशोर तलरेजा, ॲड.सागर चित्रे, रितेश जैन, मुकेश महाजन  यांनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.