धूमस्टाईलने येत शिक्षिकेची सोनसाखळी लांबविली

0

जळगाव;- शाळेमध्ये शिक्षिका असणारी महिला रस्त्याने पायी चालत असताना अचानक दुचाकीने दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केल्याची घटना शुक्रवारी ३० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भगवान नगर मधील किलबिल शाळेजवळ घडली . याबाबत अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . दरम्यान धूमस्टाईलने येऊन महिलांच्या गळ्यातील मंगलपोत लांबविण्याचे प्रकार शहरासह जिल्ह्यात अलीकडे वाढले असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी अंगणी महिला वर्गातून व्यक्त होत आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, रोहिणी विजयकुमार नारखेडे (वय-३९) येथील रहिवाशी असून त्या एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला आहे. शुक्रवारी ३० जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रोहिणी नारखेडे या भगवान नगरातील किलबिल शाळेजवळून पायी जात असतांना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येवून त्यांच्या गळ्यातील ८० हजारांची सोन्याची पोत जबरी हिसकावून पसार झाले. महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोन्ही संशयित हे दुचाकीवरून फरार होण्यात यशस्वी झाले.महिलेने तात्काळ याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून दोघं संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देखमुख करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.