चाळीसगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण

0

चाळीसगाव ;- तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील एका १३ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील रहिवाशी असलेले रवींद्र फकिरा आगोणे वय ४१ हे मजुरी करतात. त्यांचा साई रवींद्र आगोणे वय १३ याला २८ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तुळसाई नगर येथून पळवून नेल्याची फिर्याद रवींद्र आगोणे यांनी दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि सचिन कापडणीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.