“बुलढाण्यातील अपघाताने आपले डोळे सरकारने उघडावे”; उद्धव ठाकरे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बुलडाणा (Buldana) येथे समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) एका बसचा आज मध्यरात्री भीषण अपघात होऊन २५ जणांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि बातमीच मन हेलावून टाकणारी आहे. असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हंटले आहे. येल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात होत असतात. आता पर्यंत ३०० हुन अधिक अपघात होऊन अनेक प्रवास्यांनी आपले प्राण गमावले आहे. सरकारने अपघात होऊ नये यासाठी काहीच उपाय केले नाहीत असे ठाकरे म्हणाले. बुलढाण्यातील अपघाताने आपले डोळे सरकारने उघडावे. अपघातात मरण पावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.

रात्री २ च्या सुमारास घडला अपघात
रात्री २ वाजेच्या सुमारास बुलढाण्यात एका प्रवासी बसच्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. यातील ८ सुखरूप बाहेर पडले आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.

राज्य सरकार व केंद्राकडून इतकी मदत जाहीर
बुलढाणा जिल्ह्यात खाजगी बसच्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. सोबतच या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच करंदर सरकारने मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केलेलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.