Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»धरणगाव तालुका शासकीय कबड्डी स्पर्धा संपन्न
    जळगाव जिल्हा

    धरणगाव तालुका शासकीय कबड्डी स्पर्धा संपन्न

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 30, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    दि. २८ व २९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे धरणगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन दि.२८ रोजी जी पी एस कॅम्पस चे अध्यक्ष विक्रम गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मैदानाचे पुजन करून करण्यात आले.

    पहिल्या दिवशी १४ वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या व १९ वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या स्पर्धा पार पडल्या. तर दुस-या दिवशी २९ तारखेला राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून १७ वर्ष वयोगटाच्या स्पर्धेचे उद्घाटन जि.प.सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हाॅकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीक्लब आॅफ जळगाव स्टार्स चे अध्यक्ष धनराज गोपाल कासट तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. कंखरे,  इंग्लिश मीडियम चे प्रिंसिपल सचिन पाटील, वरिष्ठ म.वि.चे प्राचार्य यु के फासे.  कनिष्ठ म.वि.चे प्रचार्य सुनिल खंडागळे, वरिष्ठ शिक्षक एस.एन.चौधरी, डी एस पाटील  यांच्या उपस्थित करण्यात आले. प्रास्ताविक  क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी केले, स्पर्धेच्या नियमांविषयी माहिती डी एन पाटील यांनी दिली. या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात गुड शेपर्ड विद्यालयाच्या मुलांचा संघ तर पथराळ विद्यालयाच्या मुलींचा संघ विजयी झाले. १७ वर्ष वयोगटात मुलांचा जी.पी.एस हायस्कूल पाळधी तर मुलींचा बी.जे. विद्यालय अनोरे विद्यार्थ्यांचा संघ विजयी झाले. १९  वर्ष वयोगटात ए.सी.ए. काॅलेजने बाजी मारली.

    संपूर्ण स्पर्धा तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. या स्पर्धेत पंच म्हणून एम डी परदेशी,  डी एन पाटील,  राकेश धनगर, अमोल सोनार, ए ए पाटील आहेरे, राजेश पावरा  यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून कायंदे  जितेंद्र ओस्तवाल, आर बी महाले, हेमंत माळी, वाय ए पाटील, ए.एम जयकारे, डी.एस पाटील, शुभम भोई यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम डी परदेशी यांनी केले तर आभार राकेश धनगर यांनी मानले. स्पर्धा पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

    Dharangaon jalgaon Kabaddi Paldhi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    राहुल गांधी यांनी चर्चेपासून पळू नये : भाजपची मागणी

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif