धानोरा येथे कारवाई, अवैध वाळू वाहणारे १२ तराफ्यांची होळी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात वाळू गटाचे लिलाव झालेले नसल्याने वाळूउपसा बंद आहे. वाळूमाफियांवर आळा घालण्यासाठी महसूल विभाग ठिकठिकाणी कारवाई करत आहे. तरीही चोरून, लपून वाळूमाफिया वाळूउपसा करून त्याची वाहतूक करताना दिसतात. वाहने पकडली जातात म्हणून वाळूमाफिया तराफ्यांवर वाळू भरून ते संबंधित ठिकाणी नदीतून वाहून नेत आहे. अशा अवैधरीत्या तराफ्यांवर वाळू वाहतूक करणारे बारा तराफे आज महसूल विभागाने पकडले आहे. सोबतच ९६ थर्मोकोलचे मोठे खोकेही जप्त करून त्याची होळी केली आहे. खेडी, धानोरा नागरिकांच्या व पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी, जळगाव मंडलाधिकारी किरण बाविस्कर, तलाठी राजू बाऱ्हे, तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार उमेश ठाकूर, श्याम पाटील, धानोरा पोलीसपाटील पूनम सोनवणे, सरपंच यशवंत कोळी, खेडी सरपंच गणेश शिंदे, पन्नालाल सोनावणे, किशोर सोनावणे, सुनील सोनवणे, सीताराम सोनवणे, दगडू सोनवणे, सुनील सूर्यवंशी, आनंदा सोनवणे, सुधीर सपकाळे, पिंटू महाजन, पंढरीनाथ सोनवणे, शिवाजी पाटील यांनी ही कारवाई केली. खेडी येथील ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी अर्जानुसार कारवाई झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.