नवापूर- पुणे बसचा अपघात; २० प्रवाशी जखमी

चालक बोलत होता मोबाईलवर

0

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नवापूर- पुणे बसला नंदुरबार जिल्ह्यातील कोडाईबारी घाटात दुपारी अपघात झाला आहे. रस्त्यावर पुढे चालत असलेल्या मालवाहू गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून बसमधील २० ते २२ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. चालक मोबाईलवर बोलत असल्याने अपघात झाल्याचे बसमधील प्रवाशांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आगारातून राज्य परिवहन महामंडळाची बस पुणे जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. नवापूर बसस्थानकातून सुटलेली बस धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरून नवापुर, विसरवाडी, चिंचपाडा येथील प्रवासी घेवुन जात कोंडाईबारी घाटात आल्यानंतर उभ्या असलेल्या मालट्रकला मागून जोरदार धडक दिली. दुपारी १ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमधील २० ते २२ प्रवासी जबर जखमी झाले आहेत.

दरम्यान अपघातात जखमी काही प्रवाशांना दहिवेल, साक्री आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी कोंडाईबारी महामार्ग सुरक्षा पोलीस, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे दाखल झाले. त्यांनी ताबडतोब महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.