शेतातली बोरं तोडली म्हणून वृद्धास जबर मारहाण

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिरपूर येथील वनवाद गाव शिवारात बोरं खाण्यासाठी तोडल्याच्या कारणावरून एका वयोवृद्ध इसमास शेतकऱ्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस उघडीस आली आहे. या संदर्भातील मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील काढण्यात आला आहे. संबंधित वृद्ध व्यक्तीस बोरं का चोरले? अशी विचारणा करत संबंधित शेतकऱ्याने जबर मारहाण केली आहे.

वृद्ध व्यक्तीस जबर मारहाण
शेतकऱ्याचे केलेल्या मारहाणीमुळे वृद्ध व्यक्ती जखमी झाली आहे. बोरं तोडली, या छोट्या कारणावरून मारहाण केल्याची घटना घडली आहे. अनुसूचित जाती प्रतिबंधक कारद्यानुसार, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित शेतकरी बोरं तोडणाऱ्या वृद्ध व्यक्तीस जबर करीत असल्याचं दिसून, येत आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा
पोलीस प्रशासनातर्फे या संदर्भातील माहिती घेऊन पुढील तपास करण्याचे काम सुरु आहे. जर पोलीस प्रशासनातर्फे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तरीदेखील संबंधित आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दिला. या घटनेमुळं परिसरात चांगलीच खळबळ झाली आहे. संबंधित नागरिक देखील अत्यंत संतप्त झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.