व्यवसाय वाढीसाठी १० लाख आणि पाच लाखांसाठी विवाहितांचा छळ

0

जळगाव ;- माहेरहून व्यवसाय वाढीसाठी १० लाख आणि ५ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी दोन वेगवेगळ्या घटनेत विवाहित महिलांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, कुसुंबा येथील माहेर असलेल्या प्राची राज पाटील वय २२ यांना कृषी दुकान वाढविण्यासाठी वेळोवेळी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी २५ एप्रिल २०२२ ला लग्न झाल्यानंतरच्या एक महिन्यानंतर ते १ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पती राज विजय पाटील ,विजय नत्थू पाटील,सोनल विजय पाटील,रोहित विजय पाटील सर्व रा. पंढरद ता. भडगाव यांनी मारहाण व माणुसकी छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सुनील सोनार करीत आहे.

 

तसेच दुसर्या घटनेत व्यवसाय वाढविण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत या मागणीसाठी वृषाली अमोल पान पाटील वय २९ रा, जळगाव या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याआपरकरणी पती अमोल श्रीराम पाटील,जेठ स्मितलकुमार श्रीराम पान पाटील ,जेठाणी मनीषा स्मितल कुमार पान पाटील सर्व रा. टागोर नगर नाशिक सासू अरुणा श्रीराम पान पाटील सासरे श्रीराम पान पाटील रा, साकरीरोड धुळे यांनी १४ ऑगष्ट २०२१ च्या दोन माहिन्यानंतर ते २० नोव्हेंबर २०२३ दरम्यान छळ केल्याची फिर्याद दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्य्क फौजदार विजय पाटील करीत आहे.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.