डंपरचालकाची तहसीलदारांच्या वाहनास धडक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वरणगाव-भुसावळचे तहसिलदार व त्यांचे सहकारी रात्रीच्या सुमारास फुलगाव पुलावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या डंपरची तपासणी करत असताना, वरणगाव सजा मंडल अधिकारी यांच्या सहकार्याच्या अंगावर डंपर आणले नंतर त्याच डंपरने तहसीलदारांच्या वाहनास धडक दिली आणि जळगावच्या दिशेने पसार झाले. वरणगाव पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने पाठलाग करीत डंपरला ताब्यात घेतले पण, चालक मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाला. सदर घटना गुरुवार (दि.११) रोजी घडली असून, चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, महसूल विभागाने अवैध गौण खनिज व रेतीची वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम राबविली होती. रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने वाहतुक करणाऱ्यांविरोधात कारवाही करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरीय रात्रीचे गस्त पथक नेमणूक करण्यात आले होते. गुरुवार (दि.११) रोजी ११ वाजेच्या सुमारास वरणगाव मंडळ अधिकारी रंजना तायडे, तलाठी (तळवेल), मंगेश पारीसे, कोतवाल जयराज भालेराव, शरद पवार, फिरोज खान सिकंदर खान, मिलिंद तायडे, ई. फुलगाव उड्डाण पुलावर रात्री ११ च्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या एका डंपरला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने डंपर न थांबवता सरळ समोरच्या पथकाच्या अंगावर चढवल्याने सर्वजण जमिनीवर कोसळले.

दरम्यान, पथकाने त्यांचा पाठलाग गेला. डंपर (क्र.एम.एच १९ झेड ४६७९) जळगावच्या दिशेने जात असल्याची माहिती तहसीलदार यांना कळवली. माहिती मिळताच तहसीलदार भुसावळ जवळील वांजोळा नाक्यावर आपले अधिकारी प्रफुल कांबळे व विलास नारखेडे हे थांबून होते. डंपरला थांबण्याचा इशारा केल्यानंतर डंपर चालकाने वाहन थेट त्यांच्या अंगावर घेतले. सोबतच डंपरचा पाठलाग करीत असताना कडगाव रस्त्यावर एका साईडला डंपर उभे करून रमेश शिवराम सपकाळे यांच्या ज्वारीच्या शेतात रेतीने भरलेले डंपर खाली करून, पिकाचे नुकसान केले. डंपर जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेत चालक पसार झाला.

याबाबत मंडळ अधिकारी रजनी तायडे यांच्या फिर्यादीनुसार डंपर चालकवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, डंपर महसूल विभागाने ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक परशुराम दळवी करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.