धक्कादायक : दिव्यांग मतिमंद १२ वर्षीय मुलीवर वृद्धाकडून लैंगिक शोषण

0

अमळनेर ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या दिव्यांग मतिमंदअसल्याचा फायदा घेऊन १२ वर्षीय मुलीवर एका ६५ वर्षीय वृद्धाने लैंगिक शोषण केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून नराधम वृद्ध विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ११ वर्षे ८ महिन्याच्या दिव्यांग आणि गतिमंद असणाऱ्या मुलीला २२ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संशयित हसन खान आमिर खान बेलदार वय ६५ याने गल्लीत खेळत असताना आरोपीने घरामागे लावलेल्या एका रिक्षात मुलीला घेऊन लैंगिक चाळे केल्याचा प्रकार घडला. यावेळी पीडित मुलगी हि घाबरली व रडत होती मात्र हा प्रकार तिने कोणालाही सांगितला नाही. याबाबत पीडित मुलीच्या आजोबानी अमळनेर पोलिसांत धाव घेऊन संशयित हसन खान याच्याविरुद्ध फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिसांत भादंवि ३७६ (२)(जे) (एल) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधी नियम कलम ३ (बी ) (क )सह ४ (३-२),, ५ (के)सह ६,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस पौनी भगवान शिरसाठ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.