दिल्लीत थंडीची भीषण लाट, रेड अलर्ट जारी

0

लोकशाही न्यूज नेट्वपर्क

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्लीमध्ये शनिवारी या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज दिल्लीतील पारा तब्बल ३.६ अंश सेल्सिअस एवढा कमी झाला होता. यामुळे दिल्लीतील दैनंदिन जीवन आणि रेल्वेच्या वेळापत्रकावर देखील परिणाम झाला.

पुढील तीन-चार दिवस थंडीची लाट

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, थंडीची ही लाट पुढील ३ ते ४ दिवस कायम राहणार आहे. १६ जानेवारीनंतर तापमानात काही बदल होऊ शकतो. पंजाब, हरियाणा, चंदिगढ, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, आणि दिल्लीमध्ये पुढील काही दिवस दाट धुकं राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.