फडणवीसांची सायबर पोलिसांकडून होणार चौकशी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, १२ मार्च २०२१ रोजी राज्यातील गृहविभागातील घोटाळा बाहेर काढला होता, त्याबाबत आपणाला बीकेसी सायबर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असल्याचे सांगितले आहे. घोटाळ्याचा अहवाल सहा महिने धूळ खात पडला होता, मात्र सरकार काय झोपले होते का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित करत यावेळी राज्य सरकारवर त्यांनी कठोर टिका केली आहे.

मार्च 2021 मध्ये मविआचा गृहविभागातील मी घोटाळा बाहेर काढला होता. याप्रकरणी सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. त्यावेळी मी घोटाळ्याची सर्व माहिती मी दिल्लीला जाऊन होम सेक्रटीरींना दिली होती. त्यांनंतर त्याचं गांभीर्य ओळखून न्यायालयाने सर्व चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. देशमुखांची सुद्धा चौकशी असून अनेक महत्वपूर्ण बाबी समोर येत आहेत. महाविकास आघाडीने आपला घोटाळा लपविण्यासाठी माझ्याविरोधात एक एफआय़र दाखल केला होता. एफआयरनुसार मला पोलिसांच्या माध्यमातून चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

तसेच फडणवीस म्हणाले की, मी ही सर्व माहिती कुठून आली याबाबत मला प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. तरीही मला वारंवार विचारणा होत आहे. मला उद्या 11 वाजता बीकेसीच्या सायबर पोलिस स्टेशनला बोलावले आहे. मी हि सर्व माहिती देशाच्या सेक्रेटरीला दिली होती. सायबर पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावले आहे. पोलिसांना मी सहकार्य करणार आहे, कारण मी गृहमंत्री राहिलो आहे. पण माहिती कशी बाहेर आली, याची विचारणा होवू नये. पोलिस बदल्या घोटाळ्याच अहवाल आला होता, तरी पण सरकार गप्प होते. राज्यांच्या मंत्र्यानीच पोलिसांना माहिती दिली. अहवाल सह महिने अहवाल धुळखात पडला होता. मी उद्या चौकशीसाठी जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारचा गृह मंत्रालयातील बदल्यांचा घोटाळा मार्च २०२१ मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढला होता. या प्रकरणातील षडयंत्राचा घोटाळ्याचे षडयंत्र विधानसभेतही त्यांनी मांडले होते. त्याचे पेन ड्राईव्ह, पेपर्स ही अध्यक्षांना दिले होते. तसेच या प्रकरणातील पुरावे हे केंद्रीय गृह सचिवांना देण्यात आली आहे. देशाच्या गृहसचिवांना ही माहिती त्याच दिवशी फडणवीसांनी दिल्लीत सादर केली आहे. त्याचे गांभिर्य ओळखून सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. त्यामुळे आता या घोटाळ्यांची चौकशी सीबीआय करीत आहे. त्यावेळी राज्य सरकारने घोटाळा दाबण्यासाठी एफआयआर दाखल केला. असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान ऑफिशिअल सिक्रेट एक्टमधील माहिती लीक कशी झाली, याबाबतचा एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्याबाबत पोलिसांकडून फडणवीसांना प्रश्नावली पाठवण्यात आली होती. याची माहिती त्यांना देईन, असे फडणवीसांनी सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.