अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; अपहरण करून अत्याचार

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चोपडा बसस्थानक येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. तसेच संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील रा.संजय नगर धरणगाव याला अटक करण्यात आली आहे.

13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही धरणगाव शहरातील एका भागात आपल्या कुटुंबीयांसह राहते. सदर अल्पवयीन मुलगी ही 17 फेब्रुवारी रोजी चोपडा येथे आपल्या आई-वडिलांसह आली होती. यावेळी संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत चोपडा बसस्थानकातून पळवून नेले होते. यानंतर गुजरातसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात सदर अल्पवयीन मुलीवर तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान संशयित आरोपीला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भास्करराव डेरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.