जळगावात दारूच्या नशेत तरुणाला बदडले

0

जळगाव ;- काहीही कारण नसताना एकाने दारूच्या नशेत एका तरुणास काठीने बदडल्याची घटना शहरातील पिंप्राळा परिसरातील सिद्धार्थ नगर परिसरात १७ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली . याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, सिद्धार्थ नगर येथे राहणारे सुरेखा अविनाश मोरे वय ३५ यांच्या घरासमोर संशयित युवराज गोमा भालेराव , विजय युवराज भालेराव रा. सिद्धार्थ नगर यांनी फिर्यादी सुरेखा मोरे यांच्या घरी दारूच्या नशेत काहीही कारण नसताना त्यांचे पती आणि मुलास काठीने मारहाण करून शिवीगाळ आणि दुखापत केली. तसेच डोके फोडण्याची धमकी दिल्याने सुरेखा मोरे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसांत १८ रोजी दोघानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ श्रद्धा रामोशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.