सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून अश्लील व्हिडीओ व्हायरल

0

जळगाव ;- सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम वर बनावट खाते अज्ञात इसमाने तयार करून त्यावर अश्लील मजकूर आणि नग्न व्हिडीओ व फोटो व्हायरल करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि, भुसावळ येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून त्यावर अज्ञात इसमाने १७ मे रोजी अश्लील मजकूर आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याचा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आल्याने त्यांनी सायबर सेलला धाव घेऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.