पाचोऱ्यात सेवानिवृत्त सैनिकाचा हृदय विकाराने मृत्यू

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा येथील समर्थ कॉलनीतील रहिवासी व मुळचे अंतुर्ली बु” तालुका भडगाव येथील रहिवासी माजी सैनिक ओंकार पितांबर पाटील यांचे दि. १९ रोजी शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ४३ वर्ष होते. ते १४ वर्षाच्या भारतीय सैन्यातील सेवेनंतर मुंबई येथे खाजगी कंपनीत नोकरी करीत होते. पाचोरा येथे ११ मे रोजी नातेवाईकात विवाह असल्याने ते १०मे रोजी मुंबई येथून पाचोऱ्याला आले होते. मयत ओंकार पितांबर पाटील यांचे पाच्छात दोन भाऊ, पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचेवर १९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता अंतुर्ली बु” तालुका भडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.