श्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…

0

 

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क:

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री. गो.से. हायस्कुल व युनिक कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्तविद्यमाने नुकतीच “सायबर सेक्युरिटी कार्यशाळा” (Cyber security workshop) संपन्न झाली. याप्रसंगी धुळे येथील सिद्धेश कॉम्प्युटरचे संचालक संतोष बिरारी व पाचोरा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक योगेश गणगे (Sub Inspector Yogesh Gange) उपस्थित होते.

संतोष बिरारी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून आर्थिक व इतर फसवणूक कशी केली जाते. व त्यापासुन कसे परावृत्त व्हावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा असे मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करून चांगले करिअर घडवावे याविषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी युनिक कम्प्युटरचे संचालक स्वप्निल ठाकरे, विद्यालयाचे पर्यवेक्षक आर. एल. पाटील, महेश कौंडिण्य यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी. तडवी यांनी तर आभार डी.डी. कुमावत यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.