धक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…

0

 

बीड, लोकशाही न्युज नेटवर्क:

बीड (Beed) शहरातून एक अत्यंत धक्कादायक (Shocking) घटना समोर आली आहे. आपल्या मुलीला एकट खेळत सोडणं तिच्या जीवावर बेतलं आहे. खेळता खेळता चौथ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मत्यू झाला आहे. दरक्शा रईसोद्दीन कुरेशी अस चिमुकलीचे नावं आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड शहरातील झमझम कॉलनी येथे रईसोद्दीन झियाओद्दीन कुरेशी हे भाड्याने राहतात. ते अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होते. दरम्यान त्यांची मुलगी दरक्शा कुरेशी ही सकाळी खेळत होती. यावेळी अचानक तिचा तोल गेल्याने चौथ्या मजल्यावरून ती थेट खाली पडली यामध्ये तीचा मृत्यू झाला. खेळता खेळता चौथ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपल्या मुलांवर लक्ष देणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे. काही घटना या घडल्यानंतर सर्वांना जाग येते मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.