Sunday, January 29, 2023

जिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला

- Advertisement -

 

लोकशाही संपादकीय लेख:

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक (District Milk Union election) शनिवार दिनांक 10 डिसेंबर रोजी होत आहे. जिल्हा दूध संघ निवडणूक शिंदे भाजप गट आणि महाविकास आघाडी अर्थात एकनाथ खडसे गट यांच्यात प्रतिष्ठेची बनली आहे. गेली सात वर्ष सत्ता असलेल्या खडसेंना दूध संघातून हद्दपार करण्याचा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी चंग बांधला आहे. सर्वपक्षीय पॅनलचा प्रयोग फसल्यानंतर शिंदे भाजप गटाचे शेतकरी विलास विकास पॅनल आणि महाविकास आघाडीचे सहकार पॅनल अशी दोन पॅनल मध्ये लढत होत आहे. दूध संघ निवडणुकीत जिल्ह्यात अवघे 441 मतदार मतदानाचा अधिकार बजावत आहे. संचालक मंडळाची एकूण वीस जागांसाठी मतदान होणार असून यापैकी एक पाचोऱ्याचे दिलीप वाघ यांची जागा बिनविरोध झाली असून 19 जागांसाठी दोन्ही पॅनलमधून प्रत्येकी 19 म्हणजे 38 आणि एक उमेदवार अपक्ष लढत असल्याने 39 उमेदवार रिंगणात आहेत.

- Advertisement -

शिंदे भाजप शेतकरी विकास पॅनलचे निवडणूक चिन्ह कपबशी असून महाविकास आघाडी सहकार पॅनलचे निवडणूक चिन्ह विमान आहे. जिल्हाभरात दोन्ही पॅनलच्या प्रचाराचा झंजावात सुरू आहे. 441 मतदारांपैकी राखीव जास्तीत जास्त मतदार आपल्याकडे वश करण्यासाठी दोन्ही पॅनल कडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे मतदारांचा भाव वधारला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दूध संघ मतदारांची दिवाळी साजरी होणार आहे, असे म्हटले जात आहे. एका दिवसांवर मतदान तारीख असताना मतदारांना उमेदवारांनी आपल्या नजरेच्या टप्प्यात ठेवले असल्याचे बोलले जात आहे. मतदारांना आमिष दाखवण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमुक अमुक एवढा भाव फुटला अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

जिल्ह्यात सात ठिकाणी त्यासाठी मतदान होणार आहे. मुक्ताईनगर मधून विद्यमान चेअरमन एकनाथ खडसे यांच्या धर्मपत्नी सौ मंदाकिनी खडसे यांचे विरुद्ध चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे निवडणूक लढवणार असून ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे मंगेश चव्हाण आणि मंदाकिनी खडसे यांच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पाचोर्‍यातून शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी महाराज राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासाठी माघार घेतल्याने दिलीप वाघ बिनविरोध निवडले जात आहेत. दिलीप वाघे शिंदे भाजप पॅनलचे समजले जातात. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी पॅनल तर्फे त्यांना त्यांचे गृहीत धरले जात आहे. दरम्यान दिलीप वाघ मात्र याबाबत मौन बाळगून आहेत. परंतु या खेळीमुळे आमदार किशोर पाटलांचा पप्पू झाला असे बोलले जात आहे. निवडणूक चुरशी बरोबर पैशाची बनली आहे. एवढे मात्र खरे…!

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे