अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांवर कारवाई

0

जळगाव : जामनेर तालुक्यात अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांवर पोलिसांकडून सात ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अवैधरित्या गावठी दारु तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यांतर्गत पथक तयार करुन पोलिसांनी दि. २२ रोजी गावठी हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांसह विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम राबविली. यामध्ये जामनेर तालुक्यातील महुखेडा, वाडी शिवार, गोंडखेल शिवार याठिकाणी कारवाई केली. या कारवाईत हजारो लिटर गावठी हातभट्टीची दारु, कच्चे रसायन व पक्के रसायन असा ऐवज नष्ट करण्यात आला. याप्रकरणी संजय भिल रा. महुखेडा, भास्कर देविदास भिल रा. वाडी,
१ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल नष्ट ; सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल
पंचफुला युवराज भिल रा. वाडी, बनाबाई अभिमान भिल रा. वाडी, शेतमालक युवराज दगडू जाधव रा. जळगाव व देविदास विठ्ठल कोळी रा. गोंडखेल, देविदास आनंदा कोळी रा. गोंडखेल, रामा कौतिक कोळी रा. गोंडखेल सर्व ता. जामनेर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या पथकाची कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे, चंद्रकांत दवंगे, पोहेकॉ सुनिल जोशी, मुकुंद पाटील, राजू तायडे, पोना चंद्रशेखर नाईक, मपोना तृप्ती नन्नवरे, निलेश घुगे, ज्ञानेश्वर देशमुख, सोनासिंग डोभाळ, महेंद्र राठोड, योगेश पाटील यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.