बंगरुळु ;– ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणात एका अभियंत्याने 1.5 कोटी रुपये गमावले. या ऑनलाईन सट्टेबाजीसाठी त्याने अनेक जणांकडून पैसे घेतले होते. त्या लोकांनी पैशांसाठी लावलेल्या तगाद्यामुळे त्याच्या पत्नीने सुसाईड नोट लिहीत जीवन संपविल्याची घटना कर्नाटकामधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा येथे घडली.
पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या दर्शन बालू नावाच्या या सहायक अभियंत्यासोबत हा प्रकार घडला.दर्शन बालू यांनी क्रिकेट सट्टेबाजीचा पर्याय निवडला. स्वत:कडे असलेले पैसे क्रिकेटच्या सट्टेबाजीत उडवले. ते पैसे संपल्यावर लोकांकडून उधार पैसे घेतले. ते पैसे सट्टेबाजीत घालवले. यामुळे लोकांना तो पैसे परत देऊ शकला नाही. यामुळे ती लोक घरी येऊन धमक्या देऊ लागले. या प्रकारामुळे दर्शन बालू यांची पत्नी रंजीता हिने आत्महत्या केली.