दुर्देवी : सिलिंडरच्या स्फोटाने इसमाचा होरपळून मृत्यू

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज सणाच्या दिवशी दुःखद घटना घडली आहे. अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. दिलीप नामदेव पाटील असे मयत व्यक्तीचे नाव आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी दिलीप पाटील यांच्या घरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण घर जळून खाक झाले.

घराचे संपूर्ण छत लाकडी असून घरात कापूस साठवून ठेवला असल्याने भीषण आग लागली. आगीने संपूर्ण घर जळत असताना दिलीप पाटील यांच्या पत्नी, मुलगा आणि नात तातडीने घराच्या बाहेर पळत आले. मात्र आगीमुळे दिलीप पाटील यांना चक्कर आल्याने ते घरात अडकून पडले. या आगीने संपूर्ण घर जळाल्याने पाटील यांना बाहेर पडता आले नाही. दरम्यान घराला आग लागल्याचे समजताच स्थानिकांना मिळेल त्या साधनाचा वापर करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही.

सदर घटनेची माहिती अमळनेर अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत दिलीप पाटील यांचा होरपळून मृत्यू झाला होता. पोलिस निरीक्षक विकास देवरे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन दिलीप पाटील यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.