जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातील घराची ताबा पावती देण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या सहकार अधिकाऱ्यासह सहाय्यक सहकार अधिकाऱ्यालाही एसीबीने रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदार यांनी जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात घर खरेदी केले होते. सदर घराची दप्तरी नोंद घेवून त्याबाबतची ताबा पावती तक्रारदार यांना देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे उपनिबंध सहकारी संस्थेतील सहकार अधिकारी विजय सुरेशचंद्र गोसावी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील सहाय्यक सहकार अधिकारी चेतन सुधाकर राणे यांनी पंचासमक्ष 5 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार उप निबंधक सहकारी संस्था, तालुका जळगाव कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात अटक केली आहे.
ही कारवाई लाचुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय संजोग बच्छाव, पीआय एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. मनोज जोशी, पो.ना. जनार्धन चौधरी, पो.ना. सुनिल शिरसाठ, पो.कॉ. प्रविण पाटील, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो.कॉ. नासिर देशमुख, पो.कॉ. ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी केली.