जामनेर ;- रिक्षातून प्रवास करीत असताना ८८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे ५४ हजार रुपये रोख आणि आधारकार्ड आणि ओळखपत्र रिक्षात बसलेल्या तीन अनोळखी भामट्यानी लांबविल्याचा प्रकार ६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जामनेर तालुक्यातील लाहसर येथील रहिवाशी असलेले राजाराम तुळशीराम पाटील (वय -८८ ) हे ६ रोजी दुपारी ३ :५० वाजेच्या सुमारास जामनेर पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावरून रिक्षा पकडून जामनेर बस स्टॅन्ड पर्यंत आले असता त्यांच्या बनियांनच्या खिशातून रिक्षात बसलेल्या तीन अनोळखी इसमांनी ५४ हजारांची रोकड आणि आधार कार्ड,एसटीचे ओळख पत्र लांबविल्याचे लक्षात आले. त्यांनी जामनेर पोलीस स्टेशन गाठून तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फिर्याद दिल्यावरून जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू सोनावणे करीत आहे.