किराणा दुकानातून साडेपाच लाखांचा किराणा सामान चोरट्याला अटक

0

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क

किराणा दुकानात काम करणाऱ्या कामगार तरुणाने दुकानातील तब्बल ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा चोरून त्याची परस्पर विक्री केली होती. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी किराणा चोरी करणाऱ्या कामगार तरुणाला शनिवार १ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अटक केली आहे. विशाल शरद पाटील रा. मेहरून असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

संशयित विशाल हा पुण्यात असल्याचे गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, सुधीर सावळे, इम्रान सय्यद , योगेश बारी ,सचिन पाटील, साईनाथ मुंडे, यांच्या पथकाने संशयित विशाल यास पुण्यातून अटक करत शनिवारी जळगाव आणले. . संशयित विशाल याच्याकडून त्याने चोरीचा किराणा विक्री केल्यातून मिळालेले तीस हजार रुपयाची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड स्वाती निकम यांनी काम पाहिले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.