वणी गडावर जाणाऱ्या भक्तांसाठी श्री बालाजी मित्र मंडळाकडून अल्पोपहार

0

पारोळा , लोकशाही न्युज नेटवर्क
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील पारोळा येथील श्री बालाजी मित्र मंडळाच्या वतीने सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी अल्पोपहार देऊन आपली सेवा सप्तशृंगी चरणी अर्पण केली असल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.

येथील मंडळाकडून दरवर्षी पारोळा येथे वनी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. मात्र यंदा पारोळा ते वनी गड यारस्त्यादरम्यान पायी जाणारा भाविकांना चिवडा,मुरमुरे, व्हेपर्स,बिस्किट,चॉकलेट, पाण्याची बाॅटल यासारख्या विविध वस्तू देत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. श्री बालाजी मित्र मंडळाचे सदस्य प्रतीक मराठे यांच्या संकल्पनेतून पारोळा येथील श्री बालाजी सेवेकरी,सोनु चौधरी,गुणवंत चौधरी सर,भैय्या चौधरी,परेश सौपुरे,सुनील पवार,प्रसाद महाजन,ज्ञानेश्वर चौधरी,प्रवीण महाले,भैय्या पाटीलकिशोर ठाकरे,संदेश पवार,अतुल मराठे,बंडू कासार,संजय बारीअमोल पाटील श्री बालाजी मित्र मंडळहे शहरातील विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसरअसतात.
त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी त्यांच्या या सेवा कार्यात आपले योगदान दिले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.