जामनेरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ ; लोखंडी रॉडने मारहाण करीत दागिने लुटले

0

जामनेर लोकशाही न्युज नेटवर्क

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी घरात घुसून एकास पायावर लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना शहरातील वर्धमान नगरमध्ये घडली असून यावेळी चोरटयांनी पत्नीचे दागिने लांबवले.

वसंत शंकर चव्हाण यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कोयंडा तोडून तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या दोघांनी घरात जबरदस्तीने प्रवेश केला. वरच्या मजल्यावरील खोलीचा व शेजाऱ्यांच्या घराच्या दरवाजाची बाहेरून कडी लावली होती. वसंत चव्हाण यांच्या पाय व डोक्यावर रॉडने मारहाण करून जखमी केले. पत्नी कलाबाई यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची पोत व कानातील दागिने हिसकावून चोरटे पसार झाले.

वसंत चव्हाण यांना रात्रीच उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कलाबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. यावेळी श्वान पथकांची मदत घेण्यात आली.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.