गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून लाखोंचा माल,पिकअप वाहन लुटून ड्रायव्हरचे अपहरण

0

चोपडा ग्रामीण पोलिसांनी केली एकाला अटक ; मुद्देमाल हस्तगत

चोपडा;-गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून कंपनीचा पार्सलचा माल व बोलेरो वाहन जबरीने चोरून ड्रायव्हरचे अपहरण केल्याचा प्रकार दोन डिसेंबर रोजी बघताना सुरत येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला याप्रकरणी दोघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की विनोद महारु पाटील वय 45 हे ड्रायव्हिंगचा व्यवसाय करीत असून एरंडोल तालुक्यातील मालखेडा येथील मूळ रहिवासी असून सध्या ते नवागाम दिंडोरी श्रीनाथ नगर उधना सुरत येथे वास्तव्याला आहेत. विनोद पाटील हे बोलेरो मालवाहू गाडी क्रमांक जीजे 05 – सीयु-1864 मध्ये कस्टमर चे पार्सल पाकिटे जात कपडे बूट घड्याळ साड्या व मोबाईल असा एकूण 13 लाख 97 हजार रुपयांचा माल कचोरी वाला हात सुरत येथे खाली करण्यासाठी २ डिसेंबर रोजी सायंकाळी जात असताना आरोपी आकाश गोरख सोनवणे वय 26 आणि आकाश विठ्ठल कोडी वय 24 दोन्ही मूळ रा. रिधुर तालुका जिल्हा जळगाव हमु. संजय नगर सुरत, यांनी विनोद पाटील यांना पिस्तुलाचा धाक दाखवून माल ,बोलेरो गाडी व विनोद पाटील यांचे अपहरण करून चोपडा तालुक्यातील कोळंबा या गावी घेऊन आले. याप्रकरणी विनोद पाटील यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आकाश कोळी व 24 याला पोलिसांनी अटक केली असून दुसरा मुख्य आरोपी आकाश सोनवणे हा फरार आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस एल नितनवरे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.