जळगावात घरफोडी ; एक लाखाचा मुद्देमाल लांबविला

0

जळगाव ;- शहरातील भिकमचंद जैन नगर येथे बंद घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश करून आतील दागिने व रोकड असा एकूण एक लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविण्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते तीन डिसेंबर 2023 रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की सागर अनिल कुरकुरे (वय 30) हे साई स्कूल पुणे येथे नोकरीला असून त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश करून 97 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोकड 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर च्या दरम्यान चोरून नेली. याप्रकरणी सागर कुरकुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.