इयत्ता नववीत शिकणाऱ्या २ मुलींवर बलात्कार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इयत्ता नववीत शिकणाऱ्या अप्ल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी शेतात जाऊन बलात्कार केल्याची संतापजनक घटना तेलवाडी (ता.पैठण) येथे शनिवारी (दि. २) रोजी घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

संजय मच्छिन्द्र मोहिते (वय २७), विलास विनायक मुळे (वय २३) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, तेलवाडी येथील एका अल्पवयीन विद्यार्थिला ‘तू मला खूप आवडते’ असे सांगून मळ्यात नेत बलात्कार केला. यानंतर दुसरा आरोपी विलास मुळे तरुणाने मुलीची आई व भाऊ पैठणला गेल्याचे पाहून तिच्या घरी गेला व मित्र मोहिते याच्या मळ्यातून मोसंबी आणायच्या असल्याचे सांगून नेले व तेथील झोपडीत बलात्कार केला.

या घटनेनंतर पीडित मुलीने पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून बलात्कार व विविध कलमांसह ऍस्ट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.