चाळीसगाव , चोपडा तालुक्यांमधून  सोळा वर्षीय मुलींना फुस लावून पळविले

0

जळगाव;-  चाळीसगाव आणि चोपडा तालुक्यातील सोळा वर्षीय दोन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फुस लावून पळून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी त्या -त्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की तालुक्यातील एका गावात मजुरी करणाऱ्या  46 वर्षीय व्यक्तीच्या दोन्ही मुली जेवण वगैरे रात्री करून सहा रोजी  झोपून गेले असता सकाळी सात रोजी आठ वाजेच्या सुमारास सोळा वर्षीय मोठी मुलगी दिसून न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेऊन सुद्धा ती मिळून आल्याने अखेर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला ९  रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या खबरीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पीएसआय लोकेश पवार करीत आहे.

दुसऱ्या घटनेत चोपडा तालुक्यातील एका गावात राहणारी सोळा वर्षे आठ महिन्याची मुलगी ही 26 जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही एक न सांगता निघून गेली असून ती अद्याप पर्यंत परत न आल्याने अखेर तिच्या पालकांनी नौरोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.