जिल्ह्यात सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे भव्य आयोजन

0

जळगाव ;- जळगाव येथे गेल्या २४ वर्षासासून सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील सालाबादाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्षपदी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उपाध्यक्षपदी एजाज मलिक, नंदू अडवाणी आणि रजनीकांत कोठारी यांची तर कार्याध्यक्षपदी माजी महापौर जयश्री महाजन, सचिवपदी राम पवार, खजिनदारपदी खुशाल चव्हाण असणार आहेत. सुकाणू समितीत प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, डॉ.राधेश्याम चौधरी, मुरलीधर महाजन, दिलीप तिवारी, चंदन कोल्हे, रविंद्र भावसार, कल्पेश सोनवणे, संग्रामसिंह राजपुत, अश्विनी देशमुख आदी असणार आहेत. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, ना.गिरीष महाजन, ना.अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर व जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन हे समितीचे मार्गदर्शक आहेत.

सर्व जाती, धर्म, समूह, विविध विचार प्रवाह या सगळ्यांना सोबत घेवून जयंती साजरी करणे हे सार्वजनिक शिवजयंतीचे वैशिष्ट्य आहे. महोत्सवाची सुरुवात दि.११ रोजी पिंप्राळा येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिज्ञा घेवून सुरुवात होणार आहे.

दि.१५ रोजी किल्ले बनवा ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत आकर्षक बक्षिसे व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. किल्ले बनविण्यासाठी लागणारे साहित्य समितीतर्फे पुरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख पुरुषोत्तम चौधरी असणार आहे. या बनविलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन व यासोबतच महेश पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेले आरमार प्रदर्शन दि.१६, १७ व १८ फेब्रुवारी असे तीन दिवस हे प्रदर्शन भाऊंचे उद्यानासमोर, काव्य रत्नावली चौकाजवळ सगळ्यांना बघण्यासाठी खुले असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.