महागड्या सायकली चोरणारा चोरटा जेरबंद ; ७ सायकली जप्त

0

जळगाव ;- शहरातून हाजारो रुपये किंमतीच्या महागड्या सायकली चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या सात सायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश अशोक राजपूत (वय १९, रा. मयुर कॉलनी) असे या चोरट्याचे नाव आहे .

जळगाव शहरातील मायादेवी नगरात राहणारे योगेश बडगुजर यांची स्कॉट कंपनीची स्पीड स्टार सायकल त्यांच्या घराच्या कंपाऊंड मधून २४ जानेवारी रोजी चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना ही सायकल पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी येथील सराईत चोरटा जयेश राजपुत याच्याकडे असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना मिळाली.त्यांनी चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याने सायकल चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने दीड लाखाच्या महागडी सायकलबरोबर इतर सात चोरलेल्या सायकली काढून दिल्या. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

यांनी केली कारावाई
पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोउनि गोपाल देशमुख, प्रदीप बोरुडे, गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ संजय सपकाळे, जितेंद्र राजपुत, सुशिल चौधरी, इरफान मलिक, पोना विनोद सुर्यवंशी, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, रविंद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, मनोज मराठे, अनिल सोननी, दीपक वंजारी यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.