हरिहरेश्वर मंदिराचे गाभारे तब्ब्ल ‘इतके’ दिवस बंद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रख्यात असलेल्या श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी १८ दिवस बंद राहणार आहे. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरीहरेश्वर मंदिर संस्थांकडून देण्यात आली आहे. वज्रलेप विधी व मंदिरातील इतर दुरुस्ती कामे (ता.१५ )फेब्रुवारी ते (ता.३) मार्चपर्यंत असे एकूण १८ दिवस करण्यात येणार.

यामध्ये श्री देव हरिहरेश्वर व श्री देव कालभैरव योगेश्वरी या मंदिरांचे गाभारे बंद राहणार असून या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष देवांच्या मूर्तींच्या दर्शनाऐवजी केवळ देवांच्या प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे. मंदिरातील गाभारे बंद ठेवण्यात येणार असल्याचे अभिषेक पूजा तसेच कौलप्रसाद, चंदन पूजा बंद असणार आहे. मात्र, घाटावरील विधिवत कामकाज म्हणजे येथे होणारे मरणोत्तर दिवसकार्य अस्थीविसर्जन, पिंडदान त्या संबंधित इतर कामे चालू राहतील, अशी माहिती हरिहरेश्वर न्यासाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.