बाबरी मशिदीची ‘ती’ वीट घेऊन राज ठाकरे पुण्यात दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले. अयोध्येतील वादग्रस्त ढाचा असलेली बाबरी मशीद पडल्यानंतर तिची वीट राज ठाकरे घेऊन पुण्यात दाखल झाले आहे. ही वीट काही दिवसांपूर्वी माणसे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांना दिली होती. बाळ नांदगावकर १९९२ मध्ये बाबरी मशीद पडली त्यावेळी अयोध्येला गेले होते. कारसेवक म्हणून बाळ नांदगावकर गेले होते. त्यांनी येताना मशिदीची वीट आपल्यासोबत आणली होती. ती वीट त्यांनी राज ठाकरे यांना नुकतीच दिली. राज ठाकरे ही वीट घेऊन पुण्यात आले.

कोणाला दिली वीट 

पुण्यातील इतिहास संशोधक मंडळात राज ठाकरे आले. यावेळी त्यांनी शिवकालीन पत्राची पाहणी केली. त्यानंतर इतिहास संशोधक मंडळाला बाबरी मशिदीची ती वीट दिली. यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणले की, आम्ही आमच्याकडे महापुरुषांना जातीत पाहतो. त्यावरून राजकारण केले जाते. हजारो वर्षांचा इतिहास खास करून करून महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा इतिहास नक्की वाचला पाहिजे. हा इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं ? हे शिकायला मिळाला पाहिजे. त्यामुळे तो वाचला पाहिजे. इतिहासावर संशोधन करणारी ही संस्था आहे. या संस्थेसाठी मला काहीतरी कारवासे वाटते. यामुळे आज मी संस्थेला २५ लाख रुपये देत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.