पत्नीचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल; पतीवर गुन्हा दाखल…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

पतीने आपल्याच पत्नीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Shocking incident of husband posting obscene videos and photos of his own wife on social media) त्याने पत्नीचा छळ करत तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले होते. याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील माहेर असलेल्या संबंधित फिर्यादी विवाहितेचे अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील भिलवाडे येथे सासर आहे. सासरी असतांना या विवाहित महिलेचा कौटुंबिक छळ झाल्याचा आरोप आहे. याशिवाय तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो तिच्या पतीने समाज माध्यमांमध्ये व्हायरल केल्याचा देखील आरोप विवाहितेने केला आहे.

या प्रकरणी कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग, आयटी अँक्ट आदी कलमाखाली चौघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखळ झाला असून, दाखल गुन्ह्याचा तपास पो.नि. प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.