“महिलांनी काही घातलं नाही तरी..”; रामदेव बाबांची जीभ घसरली

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या राज्यात महिलांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे. यामुळे मोठी संतापाची लाट उसळत आहे. त्यातच आता योगगुरु रामदेव बाबा (Yoga Guru Baba Ramdev) यांनी देखील महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

ठाण्यातील (Thane) योगा कार्यक्रमामध्ये (Yoga program) बोलताना रामदेव बाबा यांची जीभ घसरली. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.

शिंदे गटाचे अब्दुल सत्तार (Abdul Sattar), राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule), शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता रामदेव बाबांची देखील जीभ घसरली आहे. यामुळे मोठा वाद उदभवण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) या सर्वांच्या उपस्थित केलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यांनंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही.

यावर बाबा रामदेव यांनी एक विधान करत म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असे रामदेव बाबा म्हणाले.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विराट व्यक्तिमत्त्व आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासारखे ऊर्जावान व्यक्ती आहे, शिंदे-फडणवीस एकात्म भावनेने नवनिर्माण करत आहेत. या दोघांनी मिळून इतिहास रचला आहे, रचणार आहेत. मी जेव्हा झोपेतून उठतो, तेव्हाही एकनाथ शिंदे यांना झोपायला वेळ मिळत नाही, एवढा पुरुषार्थ आहे त्यांच्यात, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा” असेही रामदेव बाबा यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.