बोदवडमध्ये घरफोडी ; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

0

 

बोदवड , लोकशाही न्यूज नेटवर्क

बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गोमाता नगर येथे घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील रहिवाशी रुपेश दामोदर गांधी यांच्या घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ७७ हजार ३०० रुपयांचा माल लंपास केला आहे. यात सोन्या,चांदीचे दागिने व रोख रकमेचा समावेश आहे.
अज्ञात चोरट्यांनी घरातून किंमती मुद्देमाल चोरुन नेला आहे. याप्रकरणी रूपेश गांधी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.