एच ३ एन २ च्या पार्श्‍वभुमीवर फिवर ओपीडी सुरु

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

एच ३ एन २ च्या पार्श्‍वभुमीवर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने नुकतीच फिवर ओपीडी सुरु केली असून रुग्णांचा त्यास प्रतिसाद लाभत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ओपीडी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मेडिसीन विभागाने केले आहे.
तुम्हाला अशक्‍तपणा आलायं का ? खोकला येतोयं का ? ताप येतोयं का ? गळा दुखतोय का ? असा कुठलाही त्रास होत असल्यास आजच फिवर ओपीडीत येवून तज्ञांद्वारे मोफत तपासणी करुन घ्या. आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक टायफाईड, मलेरिया, सीबीसी, छातीचा एक्स रे या तपासण्या अत्यल्प दरात केल्या जात आहे. रुग्णालयात तज्ञ डॉ.सी.डी.सारंग, डॉ.पाराजी बाचेवार, डॉ.तुषार पाटील यांच्यासह निवासी डॉक्टरांद्वारे तपासणी केली जाते. अधिक माहितीसाठी डॉ.विनय बुरादकर यांच्याशी ७९७२८३२१५३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.