संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्रातून सुटली ७ वर्षाच्या दारुची सवय

0

डॉक्टर बनले मित्र; तरुणाला मिळाली नवप्रेरणा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

संगत गुण ते सोबत गुण असं म्हणतात ना.. त्याची प्रचिती एका २७ वर्षीय तरुणाला आली.. मित्रांच्या संगतीने दारु पिण्याची सवय लागली आणि त्यातून कौटूंबिक वादासह तरुणाचे आयुष्यदेखील उद‍्धवस्त व्हायला लागले.. अनेक ठिकाणी दारु सोडण्यासाठी नुसते पैसे खर्च झाले परंतु उपयोग झाला नाही अखेरीस डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील केंद्र शासन मान्य संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्राचा आधार रुग्णाला मिळाला आणि सात वर्षाच्या दारुची सवय अवघ्यास पंधरा दिवसातच सुटली.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात संकल्प व्यसनुक्‍ती केंद्र सुरु होवून एकच महिना झाला. आतापावेतो तब्बल २५ रुग्णांना दारुच्या व्यसनापासून मुक्‍त करण्यात केंद्राला यश आले. नुकताच एका २७ वर्षीय तरुणाला घेऊन त्याचे वडिल रुग्णालयात आले. जेमतेच महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि एका कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी सुरु केली. हातात येणारा पैसा आणि वाईट मित्रांची संगत यामुळे तो तरुण दारुच्या आहारी गेला. यामुळे कुटूंबातील वातावरण देखील खराब झाले, पाहूणे आले की त्याला घरात बंद करुन ठेवावे लागे असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

मुलाची दारु सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले, औरंगाबाद, नाशिक, पुणे येथे जाऊन लाखो रुपये खर्च झाले परंतु ये रे माझ्या मागल्या सारखी परिस्थीती पुन्हा उद्भवली. त्याचत तेथे अघोरी प्रकार, मारहाण देखील झाल्याने वडिलांसह मुलाच्या मनात भिती निर्माण झाली मात्र संकल्पतून त्यांना आशेचा किरण दिसला, रुग्णालयात येवून त्यांनी शहानिशा केली आणि येथील व्यसनमुक्‍ती तज्ञ डॉ.विलास चव्हाण, डॉ.गोविंद, डॉ.मुजाहिद, डॉ.आदित्य यांच्यासह टिम आणि समुपदेशक बबन ठाकरे यांनी रुग्णासोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करुन उपचार केले. केवळ १५ दिवसाच्या वैद्यकीय उपचारादरम्यानचा तरुणामध्ये सुधारणा झाली. दारु सोडविण्यासाठी निवासी डॉ.आदित्य जैन यांच्याशी ९४०४४७६१११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संकल्पतर्फे करण्यात आले आहे.
येथील उपचाराबाबत रुग्णाने स्वत:सांगितले की, दारु प्यायचो त्यावेळी मला भूक लागायची नाही, मी जेवायचो नाही मात्र आता मी दोन वेळचे पूर्ण जेवण घेतो आणि मला आता खूप फ्रेश वाटायला लागले, यापुढे डॉक्टर अर्थात डॉक्टर फ्रेंड जे सांगतील तसेच वागेल असेही त्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.