चाळीसगावात तालुक्यात जुगार अड्ड्यावर धाड ; ८ जुगारी ताब्यात

0

मेहुणबारे चाळीसगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरेगावजवळ दरेगाव ते उपखेड रस्त्यालगत एका ठिकाणी वाहनांच्या आडोश्याला झन्ना मन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांना मिळाली असता त्यांच्यासह संभाजी पाटील, राजेंद्र निकम, श्रीराम सांगवे, विश्वनाथ देवरे, राहुल जाधव, राहुल महाजन, महेश बागूल, मेहुणबारे पोलिस ठाण्याचे हवालदार मोहन सोनवणे, भूषण बाविस्कर यांनी बुधवारी (ता.१२) पहाटे हि धाड टाकली . या ठिकाणी १० ते १२ जण पत्ते खेळत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून रोख रकमेसह ६ दुचाकी असा ४ लाख ८३ हजार ६३० रुपयांचा ऐवज जप्त केला. या वेळी एक जुगारी दुचाकीसह फरार झाला.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी विश्‍वनाथ देवरे यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेट सहायक पोलिस अधीक्षकांनीच या जुगार अड्ड्यावर कारवाईचा बडगा उगारल्याने जुगाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.