बियाणे आणि रासायनिक खतांची लिंकिंग थांबवा – महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा तालुक्यात बी बियाणे आणि रासायनिक खतांची लिंकिंग थांबवून कृषी केंद्र चालकांची दुकाने व गोदामांची तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली,

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील तहसिलदार यांना शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यात म्हटले आहे की तालुक्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बि बियाणे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी शासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनाच्या प्रति तालुका कृषी अधिकारी आरती साळी व तहसीलदार पारोळा यांना देण्यात आल्या.

आपला तालुक्यात कृषी क्षेत्रासाठी ची खूप मोठी बाजारपेठ असून यामध्ये खते विक्री करणारे कृषी केंद्रांची संख्या बरीच आहे बाजारपेठ असल्याकारणाने शेतकऱ्यांचे हित साध्य झालं पाहिजे अशी अपेक्षा असते परंतु आपल्या शहरात तालुक्यात शेतकऱ्यांची लूट होताना दिसत आहे कापूस बियाणे पिशवी ची शासकीय किंमत ९५३ असून काही विशिष्ट पिशव्या वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करून व कृत्रिम पद्धतीने टंचाई निर्माण करून चढ्या दराने ( म्हणजेच १२०० ते १५०० रुपयांना) कृषी केंद्र चालक विक्री करताना दिसत आहे तसेच रासायनिक खतांच्या बाबतीत शेतकऱ्याने ज्या खताची मागणी केली त्या खतासोबत दुसरी म्हणजे दोन बॅगांवरती एक बॅग बळजबरीने दिली जाते जी शेतकऱ्याला नको असते परंतु जर शेतकऱ्यांने घेण्यास नकार दिला तर आमच्याकडे कोणतेही खते शिल्लक नसल्याबाबत दुकानदारांकडून सांगितलं जातं सोबतच खतांची कृत्रिम टंचाई भासविण्यात येत असून कृषी केंद्र संचालकांनी शहरासह तालुक्यातील काही खेड्यात गोदाम घेऊन त्यात मोठ्या प्रमाणात खतांचा साठा करून ठेवला आहे असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.

कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने खताची लिंकिंग करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्याचे कटकारस्थान कृषी केंद्र चालक करित आहेत शेतकऱ्यांची आर्थिक लुट थांबवण्यासाठी सर्व दुकान व  गोदाम तपासणी करून तात्काळ कारवाई करावी व आम्हा शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी अन्यथा  शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्यास होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी शासन, प्रशासनच जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटले आहे निवेदन देते वेळी सुनिल देवरे, डॉ, विनोद चौधरी, गुलाब पाटील, शांताराम पाटील, मयूर ठाकूर, सागर माळी, देवेंद्र पाटील, दिनेश शेलकर, दिपक पाटील, अनिल पाटील, मुजाहिद खाटीक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.