वरणगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलात वाहन दाखल…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जिल्हा वार्षीक सन २०२२/२३ सर्व साधारण योजना अग्नीशमन बळकटी योजने अंतर्गत नगर परिषदेला शासनाच्या वतीने ५५० लिटर क्षमतेचे लहान अग्नीशमन बंब मिळला असून आ सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांच्या सेवेत रुजू करण्यात आले.

शहरातील लहान मोठ्या गल्ली बोळातील आग विझविण्या हेतून नगर परिषदेने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कडे लहान अग्नी बंबाची मागणी केली होती. त्या अनुषंगाने अग्नीशमन बळकटी योजने अंतर्गत त्यांनी मंजुर करून नगर परिषदेला लहान अत्यधुनिक पद्धतीचा अग्नीशमन बंब सुपुर्द केला व स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालन यांच्या मार्फत फिरते सुलभ स्वैच्छालय नगर परिषदेला मिळाल्याने नागरिकाच्या सुविधेसाठी तपत कठोरा रोडवरील अग्नीशमन विभागाच्या कार्यालय आवारात तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रमूख उपस्थीत फित कापून नारळ वाढवून सेवेत दाखल करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी शे. समीर, सह पो निरिक्षक आशिष आडसुड, सुनिल काळे, प्रकाश नारखेडे, आझाद पटेल, अभय गुटाळ, दिपक भंगाळे, गंभीर कोळी, सुधाकर मराठे, दौलत गुट्टे, दिपक काळे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.